सांगलीत श्री बिरेश्वर सोसायटी शाखेचा खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

सांगली / प्रतिनिधी

कर्नाटकातील प्रतिष्ठित एकसंबा येथील श्री बीरेश्वर को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या सांगली शाखेचा प्रारंभ प.पू.शिवदेव स्वामी,खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.प.पू.शिवदेव स्वामी

 

व खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते फीत कापून या शाखेचा शुभारंभ झाला.सांगली येथील महावीरनगर वखार भाग येथे २०३ वो शाखा सुरू करण्यात आली.
श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी बेळगाव

 

जिल्ह्यातील एक्संबा गावातील आहे.चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले नेतृत्वाखाली सहसंस्थापिका, माजी मंत्री व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम यशस्वी रित्या सुरू आहे.कर्नाटक व

 

महाराष्ट्रात नव्याने अकरा शाखांचा प्रारंभ करण्यात आला.यामध्ये सांगली शाखेचा समावेश आहे.यावेळी  लॉकर व ठेव पावतीचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.यावेळी आमदार सुधीर गाडगीळ,

 

शेखर इनामदार,भाजपच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील,आप्पासिंग रजपूत उपस्थित होते.खासदार संजयकाका पाटील आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून

 

संस्थेला शूभेच्छा दिल्या.संस्थेच्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात २०६ शाखा कार्यरत आहेत.संस्थेचे ३ लाख ६४ हजारांपेक्षा अधिक सभासद आहेत.३ हजार ४३८ कोटी पेक्षा जास्त ठेवी आहेत.स्वागत उपप्रधान

 

व्यवस्थापक रमेश कुंभार यांनी केले.प्रस्ताविक संजय बोरगावे यांनी केले.यावेळी रविकुमार पाटील,विजय एकसंबे,रामचंद्र खिलारे,बाळासाहेब भोजे, बसवराज चिकमठ आदी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!