यड्राव / प्रतिनिधी
शरद इन्स्टिट्युटमधील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ऑटोमेशन’हा उद्योग,संशोधक,विद्यार्थी व नवीन प्रशिक्षकांना भविष्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून उदयास येईल.जगभरातील बदलाचे आव्हान पेलण्याचे काम हे
अत्याधुनिक तंत्रज्ञान व सेंटर करेल. यामधून सक्षम व दूरदृष्टी असलेली नवीन पिढी तयार होईल. असे प्रतिपादन यु.एस.ए.नॉर्थ इस्टर्न युनिव्हर्सिटीचे डॉ.उमेश राव यांनी केले.ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ
टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन ऑटोमेशन या अत्याधुनिक लॅबचे उदघाटनावेळी बोलत होते.यावेळी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले तंत्रज्ञानामध्ये खूप वेगाने बदल
होत आहेत.या वेगावर स्वार होण्याचे काम शरद इन्स्टिट्युटने या लॅबच्या माध्यमातून केले आहे.याचा खूप फायदा संशोधक, उद्योजक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना होणार आहे.यावेळी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे,सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ.केतन कोटेचा,ऑस्ट्रेलिया येथील सेंट्रल क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी डॉ.मिना झा, मलेशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ अॅम्प्टनच्या डॉ.सागाया,डॉ.सुनीत गुप्ता प्रमुख उपस्थित होते.या सेंटरमध्ये अत्याधुनिक रोबोट, डेव्हलपमेंट किट्स, थ्रीडी
प्रिंटर्स याचा समावेश आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान आत्मसात करणे, कौशल्ये विकसित करणे,कार्यक्षमतेत सुधारणा करणे,तंत्रज्ञानाचे मूल्यमापन करणे,सहयोग वाढवणे,नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे,सतत सुधारणा
करणे आणि प्रकल्प व्यवस्थापन प्रदान करणे होणार आहे.या सेंटरसाठी आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), नवी दिल्ली यांच्याकडून मॉडरॉब योजनेअंतर्गत सहकार्य मिळालेले आहे.यावेळी प्राचार्य
डॉ. एस.ए.खोत,डॉ.इंद्रजित गुप्ता,डॉ.गोविंगसिंग पटेल,डॉ.के.हुसेन,एस.के.शिकलगार,डॉ.प्रा. मंगेश कुलकर्णी, प्रा.कौस्तुभ शेडबाळकर,प्रा. ए.ए. देसाई, यांच्यासह सर्व डिन,प्राध्यापक उपस्थित होते.