कुरुंदवाड / प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोहिम राबवली जात आहेत.
या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कुरुंदवाड पालिका चौकात कुरुंदवाड पालिकेतर्फे रथाचे स्वागत करण्यात आले.आमदार डॉ.राजेंद्र पाटील
यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला.यावेळी डॉ.संजय पाटील,माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड,अक्षय आलासे,सुनील चव्हाण,मुख्याधिकारी आशिष चौहान उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे पालिका चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील देशभरातील लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे थेट प्रसारण या
कार्यक्रमात करण्यात आले.विविध योजनांसाठी पात्र असलेल्या, परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवण्यात आली. विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी संवाद
साधण्यात आला.तसेच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीही या वेळी करून घेण्यात आली.2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनाची माहिती देणाऱ्या विभागाला
आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. पालिकेतर्फे पंतप्रधान घरकुल योजना लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना आमदार डॉ राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी लाभार्थी
हेमांगी पाटील म्हणाल्या यांनी मी शहरात भेळ-पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करते. पीएम स्वनिधी योजनेतून मला दहा हजार रुपयांचे कर्ज मिळाले आणि मी भेळविक्री सुरू केली. पहिले कर्ज फेडले आणि आता पुन्हा २०
हजारांचे कर्ज घेतले आहे. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ मला मिळाला.लाभार्थी अनवर मकानदार म्हणाले, ‘मी पालिका चौकात फळे विक्री करतो.मी पंतप्रधान स्वनिधी योजनेतून १० हजारांचे कर्ज घेतले. ते वर्षभरात
फेडले व मला पुन्हा २० हजारांचे कर्ज मिळले. मी या योजनेमुळे आत्मनिर्भर झालो आहे. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे.यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याधिकारी चौहान यांनी केले. यावेळी पालिका,तलाठी कार्यालय,आरोग्य विभाग आणि उपजीविका विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.