शासकीय योजनांतून महिला व बालकांचा विकास

शासकीय योजनांतून महिला व बालकांचा विकास..

कोल्हापूर / प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या माहिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिला व बालकांचा विकास व संरक्षणासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सन 2022 -23 या आर्थिक

 

वर्षात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत 1 हजार 480 बालकांना 75 लाख रुपयांचा तर बाल न्याय निधी योजनेअंतर्गत 815 बालकांना सुमारे 61 लाख 4 हजार रुपयांचा लाभ

 

देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील 146 बालकांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आली असून या प्रमाणपत्राच्या आधारे जिल्ह्यातील 4 अनाथ मुले शासकीय नोकरीत रुजू झाली आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री हसन

 

मुश्रीफ यांच्या पुढाकाराने तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. तत्कालीन महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील व सध्याचे

 

अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडून यासाठी नियोजनबध्द प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील बालकांच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कोल्हापुरची

 

बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला राज्याच्या बाल हक्क आयोगाकडून नुकतेच बाल स्नेही पुरस्काराने गौरवले आहे.बालसंगोपन योजनेचा बालकांना लाभ- आर्थिक परिस्थिती अथवा अन्य कारणांनी सांभाळ होवू न

 

शकणाऱ्या तसेच कोविड-19 मुळे, अनाथ, निराधार, गरजू, एक पालकत्व असणाऱ्या मुलांसाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना राबविली जात आहे. या योजनेतून अशा बालकांना दरमहा 2 हजार 250

 

रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मार्च 2022 -23 या आर्थिक वर्षात 1 हजार 480 बालकांना 75 लाख रुपयांचा लाभ वाटप करण्यात आला आहे. तर 2 हजार 578 बालकांना लाभ मंजूर झाला असून उर्वरित 2 हजार 572 बालकांनाही लाभ

 

देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तालुकास्तरावर मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू बालकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

Spread the love
error: Content is protected !!