विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळ शहरात उत्साहात स्वागत

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी मोहिम राबवली जात आहेत.

 

या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले. शिरोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

 

आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव,भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे,भाजपा सरचिटणीस नरेंद्र माने,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव उपस्थित होते.

 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी स्क्रीन द्वारे दाखवण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते २०२४ च्या दिनदर्शिका व विविध योजनांची माहिती पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.

 

दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनाची माहिती देणाऱ्या विभागाला आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजना लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांला आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी हिंदुस्तान प्रतिष्ठाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई,माजी नगरसेवक पंडित काळे,ग्राहक संघटनेचे प्रकाश माळी,महेश देवताळे,शिरोळ इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष नितीन शेट्टी,यांच्यासह नगरपरिषद,शिरोळ तहसील कार्यालय,

 

शिरोळ पंचायत समिती कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी भाजपचे पदाधिकारी,श्री पद्माराजे विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!