इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरामध्ये आज सकाळपासूनच दिगंबरा दिगंबराच्या जयघोषामध्ये शहर दुमदुमून गेले शहरातील वेगवेगळ्या भागातील दत्त मंदिरांना आकर्षक विद्युत रोषनाई फुलांनी सजवण्यात आले होते.दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तसेच सकाळपासूनच अभिषेक व प्रसादचे वाटप प्रत्येक मंदिरामध्ये करण्यात आले होते.इचलकरंजी शहरात आज दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील यशवंत कॉलनी परिसरात असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.सकाळी सुमारे 25 स्वामींच्याद्वारे गुरु मंत्र महाअभिषेक घालण्यात आला.गद्रे दत्त मंदिरामध्ये सकाळपासूनच भजन किर्तन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला.जुन्या नगरपालिकेमध्ये असणाऱ्या दत्त मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.उद्या या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषांमध्ये आज संपूर्ण इचलकरंजी शहर दुमदुमून गेले होते तसेच प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी दत्त मंदिर आहेत त्या ठिकाणी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दर्शनासाठी भाविकाना दर्शन व्हावे यासाठी स्वयंसेवक ठेवण्यात आले होते.दत्त जयंती निमित्त इचरकंजी शहर भक्तिमय बनले होते