शिरोळच्या क्रिकेट स्पर्धेत युवा पर्व फाउंडेशनचा डंका!छावा स्पोर्ट्सच्या फुल्ल पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

Spread the love

शिरोळच्या क्रिकेट स्पर्धेत युवा पर्व फाउंडेशनचा डंका!छावा स्पोर्ट्सच्या फुल्ल पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले; अंतिम सामन्यात रंगला चुरशीचा थरार

शिरोळ / प्रतिनिधी

दिवाळीच्या उत्सवी वातावरणात शिरोळ येथे क्रिकेटप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य फुल्ल पीच क्रिकेट स्पर्धेत युवा पर्व फाउंडेशन, शिरोळच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. छावा स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित या स्पर्धेत युवा पर्व फाउंडेशनने प्रतिस्पर्धी संघांना मात देत प्रथम क्रमांक पटकावला. अंतिम सामन्यातील अटीतटीच्या लढतीत उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर युवा पर्व फाउंडेशनने बाजी मारत स्पर्धेचे मानकरी होण्याचा बहुमान मिळवला.

दिवाळीनिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे शिरोळ परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. विविध संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत आपले कौशल्य पणाला लावले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः अंतिम सामना अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी विजयासाठी शेवटपर्यंत संघर्ष केला. मात्र, युवा पर्व फाउंडेशनच्या खेळाडूंनी संयम, जिद्द आणि अचूक नियोजनाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली.

या स्पर्धेत युवा पर्व फाउंडेशनने प्रथम क्रमांक पटकावला, तर यजमान छावा स्पोर्ट्स, शिरोळ यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. एम. के. स्पोर्ट्स, जयसिंगपूर यांनी तृतीय, तर जांभळी स्पोर्ट्स, जांभळी यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

विजेत्या युवा पर्व फाउंडेशनच्या संघाकडून रोहित खांडेकर, मुकेश थोरात, सौरभ, आदित्य आणि आशितोष या खेळाडूंनी विशेष कौशल्य दाखवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या आक्रमक फलंदाजी, प्रभावी गोलंदाजी आणि सांघिक समन्वयामुळे संघाला विजेतेपदापर्यंत मजल मारता आली.

या संघाच्या यशामागे युवा पर्व फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय माने (डीएम) यांच्यासह पृथ्वीराज शिंदे, विकी शिंदे, सत्यजित मोरे, दिगंबर इंगळे, रितेश कोळी, वैभव पाटील, प्रतीक संकपाळ, शिवराज ठोंबरे, किरण माने, अक्षय यादव, विजय शेट्टी, सौरभ काळे, चैतन्य कोळी, हरीश कोळी, चिन्मय कोळी, अमोल चुडमुंगे, अथर्व कोळी, ओंकार कोळी, विश्वजीत कोळी, ओम गंगधर, आदित्य भातमारे, शाहिद शेख, रोहित कोळी, अल्लू कोळी, आकाश रणवरे, माणिक पुजारी, ऋषिकेश कोळी, वैभव शिंदे, अक्षय गंगधर, सनी रणवरे, प्रेम कांबळे, केदार शिंदे आणि समर्थ वायचळ यांच्यासह फाउंडेशनचे सर्व सदस्य व हितचिंतक यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.

मैदानावरील खेळाडूंची जिद्द आणि मैदानाबाहेरील पदाधिकारी व सदस्यांचे नियोजनबद्ध सहकार्य यामुळे युवा पर्व फाउंडेशनने मिळवलेले हे यश शिरोळच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.विजेत्या संघाचे अध्यक्ष, खेळाडू, पदाधिकारी आणि सर्व सदस्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!