डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा निर्धार; शिरोळच्या जय भवानी मंडळाच्या अध्यक्षपदी रोहन गायकवाड

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ येथील माळभाग परिसरातील श्री जय भवानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या २०२६-२७ या वर्षाच्या गणेशोत्सव कार्यकारिणीची बिनविरोध निवड नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.नव्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रोहन गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त, भक्तिमय आणि सामाजिक बांधिलकी जपणारा स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.

निवड झालेल्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नितीन लोहार, खजिनदारपदी आदित्य चावरे, सहखजिनदारपदी प्रज्वल जाधव, सचिवपदी यश लोहार, स्वागताध्यक्षपदी महावीर शेट्टी व राहुल तावरे, सहस्वागताध्यक्षपदी धनाजी महात्मे तसेच ऑडिटरपदी वैभव लोंढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासह ऐतिहासिक सजीव देखावा उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख करण्याचा संकल्पही मंडळाने केला आहे. धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणण्यासाठी मंडळ प्रयत्नशील राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीस मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि मावळते अध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्यासह मुकुंद लोंढे, सागर चावरे, योगेश पिसाळ, प्रसाद चावरे, विजय कोळी, अक्षय कोळी, नंदकिशोर फल्ले, धीरज तावरे, कुमार पिसाळ, प्रशांत गायकवाड, भूषण कोळी, ज्ञानेश्वर कोळी, अमर मुडशिंगे, प्रवीण जाधव, निलेश सुतार, विश्वजीत जाधव, शिल्पेश जाधव, अनिल गंगधर, अविनाश सुतार, विनायक लोंढे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यंदाचा गणेशोत्सव भक्ती,संस्कृती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम ठरेल, असा विश्वास नूतन अध्यक्ष रोहन गायकवाड यांनी व्यक्त केला.मंडळाच्या या निर्णयाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून,डॉल्बीमुक्त आणि संस्कारक्षम गणेशोत्सवाची परंपरा अधिक बळकट होईल,अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!