कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे गुरू-शिष्य परंपरेचा जागर; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

Spread the love

कन्या विद्या मंदिर हेरवाड येथे गुरू-शिष्य परंपरेचा जागर; गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी!

​हेरवाड / प्रतिनिधी

.भारतीय संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते,आणि या संस्कृतीतील गुरू-शिष्याचे पवित्र नाते अधिक घट्ट करणारा सण म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा’. याच उज्ज्वल परंपरेचा जागर करत कन्या विद्या मंदिर,हेरवाड ता.शिरोळ) येथे गुरुपौर्णिमा अत्यंत मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली.

​कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने झाली.या प्रसंगी उपस्थित मार्गदर्शकांनी गुरुपौर्णिमेचे भारतीय परंपरेतील अनन्यसाधारण महत्त्व आणि गुरूंच्या मार्गदर्शनाने आयुष्याला मिळणारी दिशा यावर सविस्तर प्रकाश टाकला.विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा आशीर्वाद घेतला.सर्व विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या शिक्षकांना आदरपूर्वक पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे पूजन केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक सुभाष तराळ, बाबालाल बाणदार,दिलीप शिरढोणे, गुंडा परीट,शिक्षिका ज्योती परीट, गीता ढवळे,प्रेरणा मोरे,धनश्री होनमाने यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रम भावपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Leave a Comment

error: Content is protected !!