पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मसोबा मंदीर परिसरात कल्याण मटका घेणाऱ्यावर शिरोली पोलिसानी कारवाई करत रोख रक्कमेसह मटक्याचे साहित्य जप्त केले . ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रवीण प्रकाश कांबळे (वय ३०, रा. समाज मंदिर जवळ, हालोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरोली औद्योगिक वसाहतीमधील मसोबा मंदीर येथील विपुल टी स्टॉलच्या आडोशाला रोडवर कांबळे हा मोबाईलवरून कल्याण मटका घेत होता. ते पांढऱ्या कागदावर लिहून स्वतःच्या फायद्याकरिता लोकांकडून पैसे गोळा करून जुगार खेळ चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शिरोली पोलिसानी कारवाई करत मटक्याचे आकडे लिहिलेले साहित्य, रोख रक्कम व पेन असा एकूण १ हजार ८५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .