नीट परीक्षेत घवघवीत यश; कु. सूर्या सुभाष पाटील यांचा महाडिक पार्टी व ग्रामपंचायतीकडून सत्कार
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. सूर्या सुभाष पाटील यांचा महाडिक पार्टी आणि पुलाची शिरोली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांच्या हस्ते कु. सूर्या पाटील यांचा पुष्पगुच्छ, शाल देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, डॉ. सुभाष पाटील, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार, सागर कौंदाडे, योगेश खवरे, दीपक यादव, बटील देसाई, हिदायत पटेल, बाळासो पाटील, संदेश शिंदे, संपत संकपाळ, शिरोली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय पाटील, धनाजी पाटील, अजित देशपांडे, नितीन चव्हाण, युवा नेते सागर मोरे, सुशांत गुरव, सचिन गायकवाड संदीप तानवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कु. सूर्या पाटील यांच्या मेहनतीचे व जिद्दीचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कुटुंबीयांच्या पाठबळाच्या जोरावर हे यश मिळविल्याचे सांगत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
पुलाची शिरोलीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणे ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करण्याबरोबरच इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे प्रेरित करण्याचा हा उपक्रम असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी व महाडिक पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारानंतर उपस्थितांनी कु. सूर्या सुभाष पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.