हेरवाडात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा, योगामुळे शरीराला स्थिरता, मनावर नियंत्रण मिळते : योग शिक्षिका प्रियांका पोळ

Spread the love

हेरवाड / दिलीप शिरढोणे 

मानवी जीवन निरोगी, आनंदी आणि सुसह्य बनविण्यासाठी योगाची नितांत आवश्यकता असून नियमित योगाभ्यासामुळे शरीराला स्थिरता (स्टेबिलिटी) प्राप्त होते तसेच मनावर नियंत्रण (माईंड कंट्रोल) मिळविण्यास मोठी मदत होते, असे प्रतिपादन योग शिक्षिका प्रियांका पोळ यांनी केले.

हेरवाड ग्रामपंचायत, कन्या विद्या मंदिर, कुमार विद्या मंदिर आणि अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मिरॅकल योगा हब, कोल्हापूर संचलित नाईट कॉलेजच्या योग शिक्षिका प्रियांका पोळ बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक सूर्यनमस्काराने झाली.त्यानंतर प्रियांका पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम, एरोबिक्स तसेच झुंबा डान्सचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.या उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. योगाच्या विविध प्रकारांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनीही मोठ्या उत्साहाने योगाभ्यास केला.यावेळी केवळ शारीरिक व्यायामाचे महत्त्व अधोरेखित न करता संतुलित आहार, नियमित दिनचर्या आणि मानसिक आरोग्य याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बदलत्या जीवनशैलीत ताणतणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी योग हा प्रभावी उपाय असल्याचेही प्रियांका पोळ यांनी सांगितले.योग दिनाच्या कार्यक्रमाला गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यामध्ये सरपंच रेखा जाधव, ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, संतोष चिंदरकर, युवा नेते प्रथमेश पाटील, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय जोंधळे, सुकुमार पाटील, दिनकर शिंगे, मुख्याध्यापक सुभाष तराळ, शामराव कांबळे यांच्यासह शाळांतील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.आरोग्यदायी जीवनाचा संदेश देणारा हा योग दिन कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि सकारात्मक वातावरणात संपन्न झाला. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!