जायंट्स ग्रुपतर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

Spread the love
जयसिंगपूर / प्रतिनिधी
जायंट्स ग्रुप ऑफ जयसिंगपूर गोल्ड सिटी आणि जायंट्स ग्रुप ऑफ दुर्गा सहेली यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला दोन्ही ग्रुपचे पदाधिकारी,सदस्य आणि योगप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात वेलनेस सेंटरच्या अर्चिता गिड्ड यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.तसेच दुर्गा सहेलीच्या उपाध्यक्षा अॅड. शर्मिला देशपांडे यांनीही योगाभ्यासाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. यावेळी योगासने, प्राणायाम आणि निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या संतुलित आहाराविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.ग्रुपच्या संस्थापिका तसेच जायंट्स फेडरेशनच्या उपाध्यक्षा डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नियमित योगाभ्यास आणि योग्य प्रमाणात घेतलेला संतुलित आहार हाच निरोगी व आनंदी आयुष्याचा मूलमंत्र आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी योगाची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास जायंट्स फेडरेशनचे स्पेशल ऑफिसर व गोल्ड सिटीचे सुधीर (भैय्या) कुलकर्णी, शंकर देसाई, एस. के. कुलकर्णी, पांडुरंग बडगर, उमेश कोळेकर, चंद्रकांत बोरगावे, आर. के. पाटील नांद्रेकर आदी उपस्थित होते. तसेच दुर्गा सहेलीच्या अध्यक्षा स्मिता कोरे, संगीता जाधव, नलिनी देसाई, अनुराधा वेल्हाळ, कुसुम जगदाळे, प्रतिभा ढापरे आणि गंगा तशिलदार यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.योगाबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम यशस्वी ठरला. उपस्थितांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!