शिरोली पुलाची येथे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त शाहजान पान शॉपवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Spread the love

शिरोली पुलाची येथे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखू जप्त शाहजान पान शॉपवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुलाची शिरोली ता हातकणंगले येथील शिरोली मॅनरोडवर असलेल्या शाहजान पान शॉपवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि सुगंधी तंबाखूसह २०४६ रुपयांच्या मुद्देमालासह ५३९ पुड्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात पान शॉप चालक अब्दुल करीम अहमद शेख (वय ५९, सध्या रा. शिरोली मेनरोड, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसातून मिळालेल्यामाहितीनुसार अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी निकिता बाळासो ढाले (वय २५) यांना शिरोली पुलाची येथील शाहजान पान शॉपमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यानी बुधवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या पथकासह दुकानावर अचानक छापा टाकला. या छाप्यात दुकानाची झडती घेतली असता, महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या आरएमडी पानमसाला ३० पुड्या (किंमत ४५० रु.) , केसरयुक्त विमल पानमसाला (छोटा व मोठा) एकूण ११४ पुड्या (किंमत ७८७ रु.) , मुसाफिर पानमसाला: ३३ पुड्या (किंमत १३२ रु.) , आर १ सुगंधी तंबाखू: ४४ पुड्या (किंमत ६६ रु.) , एम गोल्ड सुगंधी तंबाखू: ३० पुड्या (किंमत ३०० रु.) , एम ४ जाफरानी जर्दा: ३६ पुड्या (किंमत ३६ रु.) , व्ही १ तंबाखू: १८२ पुड्या (किंमत २७३ रु.) अशा प्रकारे एकूण ५३९ पुड्या आणि २०४६ रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!