शिरोळ तालुक्यात मतदार पुनिरीक्षणासाठी काँग्रेसचा पुढाकार अचूक व योग्य मतदार नोंदणीकडे देणार लक्ष

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

पश्चिम बंगाल राज्यातील मतदा तज्ञन वगळून भाजपने त्या ठिकाणी सत्ता आणली. याच धर्तीवर केंद्र सरकार मतदार पुनिरीक्षण कार्यक्रम राबवून काँग्रेस विचाराचे मतदार मतदार यादीतून वगळून आपल्या विचाराचे मतदार यादीत ठेवून सत्ता काबीज करीत आहे.त्यामुळे काँग्रेस पक्षाच्यावतीने मतदार पुनिरीक्षण कार्यक्रमात घोळ होऊ नये, अचूक मतदान नोंदणी होण्यासाठी पुढाकार घेतला असून प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमण्यात येणार आहे. याकरिता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदार पुनिरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशी माहिती काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पुष्कराज देशमुख यांनी शिरोळ येथे दिली.शिरोळ तालुक्यातील मतदारांचा हक्क आबाधीत राहावा. बोगस मतदारांची नावे वगळली जावीत यासाठी तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने मतदार पुनिरीक्षण कार्यक्रमात पुढाकार घेऊन अचूक व योग्य मतदार नोंदणीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.त्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनिरीक्षण (SIR) या कार्यक्रमाचे प्रशिक्षण शिबिर येथील कल्लेश्वर मंदिरात संपन्न झाले.या मतदार पुनिरीक्षण प्रशिक्षण शिबिराचे स्वागत शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दरगू गावडे यांनी केले. दत्त साखर कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी प्रास्ताविक केले.जयसिंगपूरचे माजी नगरसेवक अशोकराव कोळेकर यांनी मतदार पुनिरीक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी व सूचना मांडल्या. भाजपा प्रणित केंद्र सरकारने अनेक राज्यात मतदारांची नावे वगळून त्या ठिकाणी भाजपाची सत्ता आणली आहे. यामुळे केंद्र सरकारने मतदार पुनिरीक्षण कार्यक्रमातून काँग्रेस विचाराचे मतदार वगळण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे अचूक आणि योग्य मतदार नोंदणी व्हावी. बोगस मतदारांची नावे वगळली जावीत याकडे काँग्रेस पक्ष जातीने लक्ष देणार आहे. याकरिता काँग्रेस पक्षाकडून मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधीची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्याकडून अचूक आणि योग्य पद्धतीची मतदान नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.अशी माहिती देत पक्षाचे पदाधिकारी शशांक बावचकर, पुष्पराज देशपांडे, अभिषेक मिठारी, सौ. वेदवती मोहिते, जयवंत वाळकुंजे यांनी मतदार पुनरीक्षण कार्यक्रमासंदर्भात सखोल मार्गदर्शन करून कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी दिलीप पाटील कोथळीकर, गुंडाप्पा पवार, युनूस डांगे, अमोल चौगुले, गजानन चौगुले, पंडित काळे, विजय आरगे, गजानन संकपाळ , धनाजी पाटील नरदेकर, बाळासाहेब कोळी (दिवाण), शक्तीजीत गुरव , बापूसाहेब गंगधर, निलेश गावडे, सुरेश माणगावे, नितीन बागे, प्रदीप बनगे, ॲड .अनिरुद्ध कांबळे , शंकर कांबळे, उमेश माळगे, दिनेश कांबळे,यांच्यासह शिरोळ तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सुदर्शन कदम यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!