कुरुंदवाड / प्रतिनिधी
आज खर तर आपल्या आजूबाजूला समाजात पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की वाद,कलह,विसंवाद, भांडण, नैराश्य,घटस्फोट,आत्महत्या आणि माणसामाणसांमधले हेवेदावे वाढत चालल्यामुळे आज माणसाचे आयुष्य जे आहे.ते अक्षरशः काळवंडून गेले आहे.अशा प्रसंगी संकटात झुंजणाऱ्या माणसांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे प्रतिपादन युवा व्याख्यात्या कु.प्रज्ञा श्रीकांत माळकर यांनी केले.त्या साधना मंडळ कुरुंदवाड व राष्ट्रसेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्णमहोत्सवी वर्ष व्याख्यानमालेच्या दुसरे पुष्प गुंफताना ‘अशी घडली मोठी माणसं ‘ या विषयांवर बोलत होत्या.स्वागत व प्रास्ताविक साधना मंडळाचे अध्यक्ष सदाशिव सुभेदार यांनी केले.अतिथी परिचय राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ यांनी केली.त्या पुढे म्हणाल्या की आज खर तर आपल्या आजूबाजूला समाजात पाहतोय परिस्थिती अशी झाली आहे की वाद,कलह,विसंवाद, भांडण,नैराश्य, घटस्फोट,आत्महत्या आणि माणसामाणसांमधले हेवेदावे वाढत चालल्यामुळे आज माणसाचे आयुष्य जे आहे. ते अक्षरशः काळवंडून गेले आहे.विदारक पार्श्वभूमीवर आम्ही आनंदाने जगायचे तरी कसे? आमच्या जगण्याला बळ आणि मनाला उभारी द्यायची तरी कशी? आणि जीवनातल्या या साऱ्या संकटांचा सामना करायचा असेल तर पाहायचे तरी कोणाकडे? आजपर्यंतचे होवून गेलेले सगळे संत,महापुरुष, आमच्या देशातले क्रांतीकारक या सगळ्यांची जीवनचरित्रे ही खऱ्या अर्थाने आमच्या समोर आदर्श म्हणून उभे ठाकतात. संत,महापुरुषांची आणि समाजात होवून गेलेल्या चांगल्या माणसांनी दाखविलेल्या वाटेवरुन चालण्याची नितांत आवश्यकता आहे.माणसांचा आनंद हरवत चाललेला आहे.माणसाच आयुष्य हरवत चाललेलं आहे.दुःखमय झालेलं आहे. याप्रसंगी अॅड. श्रीकांत माळकर बोलताना म्हणाले की,चरित्र माणसांचे जीवन घडवितात.आज जर कष्ट घेतले नाहीत तर उद्या आपणाला यश मिळणार नाही.समाजाने ज्या माणसांना वेडे ठरविले त्याच माणसांनी समाजाला शहाणे केले.मिळालेले आयुष्य उत्तम पध्दतीने जगले त्यांचं आयुष्य धन्य झाले.१५ ते २५ मे २०२६ अखेर चालणाऱ्या व्याख्यानमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.विशेषतः विद्यार्थी व महिलांची उपस्थिती वैशिष्ट्यपूर्ण होती.आभार महावीर कडाळे यांनी मानले.