पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक) संचलित श्रीमती सोनाबाई शं. जाधव मूलभूत प्रशिक्षण केंद्र व स्व. जवानमलजी गांधी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, नागांव यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.या व्याख्यानाचे आयोजन कै. सुनिल जनवाडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आले आहे ‘आरोग्य, सदाचार आणि व्यसनमुक्ती’ या विषयावर हे व्याख्यान संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता नाना पाटील प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे उद्घाटन युवा उद्योजक यतीन जनवाडकर (मे. व्हर्सटाईल ग्रुप) यांच्या हस्ते होणार असून, कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेन्द्र जैन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी उद्योजिका बिना जनवाडकर , स्मॅकचे अध्यक्ष जयदिप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, स्मॅक आयटीआयचे चेअरमन प्रशांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १५ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता स्मॅक आरटीआय शिरोली येथे होणार असून या कार्यक्रमास शिरोली एमआयडीसी मधील उद्योजक, सभासद आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.