लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपी शाहिदला संजय घोडावत विद्यापीठातून हकालपट्टी करा – हिंदुत्ववादी संघटना

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या लव्ह जिहाद या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.शाहिद सनदे या युवकाने मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.या घटनेच्या निषेधार्थ गाव बंदची हाक देण्यात आली होती.व्यापारी,नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत संताप व्यक्त केला.आरोपी शाहिद सनदे हा संजय घोडावत विद्यापीठ येथे शिक्षण घेत असल्याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विद्यापीठावर धडक दिली. कार्यकर्त्यांनी विद्यापीठाचे ट्रस्टी विनायक भोसले आणि उपकुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांची भेट घेऊन तीव्र भूमिका मांडली. शाहिद सनदेला तात्काळ विद्यापीठातून निष्कासित करावे,त्याला भविष्यात कोणत्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळू नये,तसेच त्याच्या सहकाऱ्यांचीही सखोल चौकशी करावी,अशी ठाम मागणी करण्यात आली.कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने निर्णय घेत शाहिद सनदेला विद्यापीठातून रेस्टीकेट (हकालपट्टी) केले.यासंदर्भातील अधिकृत दाखला कार्यकर्त्यांना सुपूर्द करण्यात आला.या निर्णयानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.दरम्यान,या प्रकरणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी,अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.ही घटना केवळ एका गावापुरती मर्यादित नसून समाजातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधणारी ठरत आहे.प्रशासनाने तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!