विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, ट्रॅक्टरसह ११ लाखाचा मुददेमाल जप्त, वनविभागाची मोठी कारवाई .

Spread the love

पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे 

विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या दोघांवर वनविभागाने कारवाई करत ११ लाखाचा मुददेमाल जप्त केला हि कारवाई मौजे वडगांव ते नागाव रस्त्यावर करण्यात आली वनविभागाने धाडसी कारवाई केल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.वनविभागाकडून मिळालेली माहीती अशी कि नागाव ता हातकणंगले येथील लाकूड मालक पवन महादेव लोंढे व ट्रॅक्टर मालक सुदर्शन अरुण बिरांजे हे दोघे विनापरवाना मौजे वडगाव ते नागाव दरम्यान लाकूड वाहतूक करताना वनविभागाच्या गस्त पथकाने मौजे वडगांव गावच्या हद्दीत लाकूड घेवून जाणारा ट्रॅक्टर क्रमांक एम एच ५१ ए २८७७ आडवून पवन लोंढे व सुदर्शन बिरांजे यांच्याकडे वाहतूक परवान्याची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे सांगितले लोंढे याची नागाव येथील आपट्याच्या माळावर लाकूड वखार असून तेथे हा विनापरवाना झाडे तोडून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे . ही कारवाई ३० जानेवारी रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास श्री नंदकुमार नलवडे वनक्षेत्रपाल करवीर, श्री. कुंडलिक कांबळे वनपाल व श्री. प्रदीप जोशी वनरक्षक नरंदे यानी भागात गस्त घालत असताना केली त्यानुसार वनरक्षक नरंदे यांनी ट्रॅक्टर चालक आणि लाकूड मालक यांच्यावर वनगुन्हा (प्र.रि.गु.क्र. ०१/२०२६) नोंदवत ११ लाखाचा मुददेमाल जप्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!