शिरोळ लिंगायत कुंभार समाज अध्यक्षपदी तात्यासो कुंभार उपाध्यक्ष पदी शितल कुंभार बिनविरोध निवड 

Spread the love
शिरोळ / प्रतिनिधी 
शिरोळ लिंगायत कुंभार समाजाची नवीन कार्यकारणी लिंगायत कुंभार समाज नवीन हॉलमध्ये बैठकीत एकमताने जाहीर करण्यात आली.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणारी ही कार्यकारणी समाजबांधवांच्या उपस्थितीत अधिकृतपणे घोषित करण्यात आली.या निवडणुकीत अध्यक्षपदी तात्यासो आप्पासो कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी शितल गुंडाप्पा कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ऑडिटरपदी गजानन रामचंद्र कुंभार यांची निवड करण्यात आली.कार्यकारणीतील संचालकपदी सुजित रामचंद्र कुंभार, भरत अशोक कुंभार, प्रसन्न गुंडप्पा कुंभार, अभय सदाशिव कुंभार, धिरज संजय कुंभार, शितल सदाशिव कुंभार, प्रविण शिवाजी आंबी, महेश भुपाल कुंभार,गणेश दुर्योधन कुंभार, राजेंद्र सातलिंगा कुंभार, पांडुरंग रत्नाप्पा कुंभार यांची निवड करण्यात आली.तसेच समाजाच्या मार्गदर्शनासाठी सल्लागारपदी सुभाष भीमप्पा आंबी,गणेश भुपाल कुलकर्णी, बाबासो नागाण्णा कुंभार व दत्तगुरु सुभाष आंबी यांची एकमताने निवड करण्यात आली.सदरची निवड ५ वर्षासाठी राहणार आहे. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष तात्यासो आप्पासो कुंभार यांनी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी संघटितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.युवकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समाजातील गरजू घटकांना मदत करणे तसेच परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील,असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमास शिरोळ लिंगायत कुंभार समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक,माजी पदाधिकारी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजातील विविध कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

error: Content is protected !!