यादव नगर पुष्पक नगरातून स्थानिक उमेदवाराची मागणी, नीरज कलावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा

Spread the love

प्रतिनिधी / शिरोळ

शिरोळ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजताच वार्ड क्रमांक एकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.या वार्डातून स्थानिक आणि जनतेतून उभा राहणारा उमेदवार हवा,अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.यादव नगर व पुष्पक नगर परिसरातील मतदारांतून नीरज कलावंत यांचे नाव चर्चेत आहे.नीरज कलावंत हे ओबीसी संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते दिलीप कलावंत सर यांचे चिरंजीव असून,स्थानिक पातळीवर ते समाजकार्यात सक्रिय आहेत.तरुण, उत्साही आणि होतकरू स्वभावामुळे परिसरातील तरुण वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहत आहे. समाजसेवेची आवड,लोकांशी सलोखा व प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती यामुळे नीरज कलावंत हे जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की,“नीरज कलावंत यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांना भरघोस मतांनी विजयी करू.त्यांच्या वडिलांचा समाजात चांगला संपर्क असून,त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी पुढाकार घेतला आहे.त्यामुळे या घराण्याचा जनसंपर्क आणि विश्वास हा विजयाची गुरुकिल्ली ठरेल.वार्ड क्रमांक एकमधील नागरिक आता बाहेरून आणलेल्या उमेदवारांना नाकारून स्वतःच्या परिसरातील प्रतिनिधी निवडण्याच्या भूमिकेत आहेत.आमचा उमेदवार आमचाच असावा,जो आमच्यात राहतो, आमच्या समस्या जाणतो आणि सतत उपलब्ध राहतो,असा स्पष्ट सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे.शिरोळ नगरपालिकेच्या राजकारणात नव्या पिढीचा सहभाग वाढावा आणि तरुणांना संधी मिळावी,अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.नीरज कलावंत यांच्या नावाभोवती सुरू झालेली चर्चा आगामी निवडणुकीत कोणत्या दिशेने वळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Comment

error: Content is protected !!