शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक ७ मध्ये जनतेने ठरवलेले उमेदवार म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्गातून सौ.शुभांगी निळकंठ उर्फ पिंटू फल्ले व शरद मोरे यांचा उमेदवारीची चर्चा संपूर्ण वॉर्डात होत असून, नागरिकांनीच त्यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह धरल्याने ही उमेदवारी खऱ्या अर्थाने जनतेची उमेदवारी ठरली आहे.निलकंठ उर्फ पिंटू फल्ले व शरद मोरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली वॉर्ड क्रमांक ७ मधील विविध भागांत प्रचारफेरी सुरू करण्यात आली.या फेरीदरम्यान स्थानिक नागरिक,महिला वर्ग,युवक तसेच ज्येष्ठ मतदार यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केले.घराघरांत भेटी देत मतदारांशी संवाद साधत असताना सौ.फल्ले यांनी वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व कार्यक्षम नेतृत्व देण्याचे आश्वासन दिले.शिरोळ नगरपरिषदेमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी सुशिक्षित,प्रामाणिक व जनतेतून उभे राहिलेले नेतृत्व आवश्यक असल्याचे मत शरद मोरे यांनी यावेळी व्यक्त केले.वॉर्ड क्रमांक ७ मध्ये पाणीपुरवठा,रस्ते, स्वच्छता व आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याची ग्वाही सौ.फल्ले यांनी दिली. प्रचारफेरीदरम्यान नागरिकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता व उर्जा दिसून आली.“आपला उमेदवार,आपला विकास” या घोषवाक्याने संपूर्ण वॉर्डात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. महिलांचा मोठा सहभाग आणि तरुण वर्गाची साथ यामुळे या प्रचार मोहिमेला वेग आला असून सौ.शुभांगी फल्ले व शरद मोरे यांच्या उमेदवारीला व्यापक लोकसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.