नृसिंहवाडीत त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांनी दीपोत्सव उत्साहात साजरा

Spread the love

नृसिंहवाडी / प्रतिनिधी

त्रिपुरारी पौर्णिमेच्या पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.कृष्णा नदीच्या काठावर दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी परिसरात केली होती.संध्याकाळी मंदिर परिसरात दीपप्रज्वलनाने संपूर्ण दत्त मंदिर परिसर दिव्यांच्या सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघाला. कृष्णाकाठावरील मंदिर परिसर,घाट, रस्ते आणि गल्लीबोळ दिव्यांच्या रांगांनी सजले होते.या नयनरम्य दृश्याने संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघाला.भाविकांनी ‘जय गुरुदेव’च्या घोषात दत्तगुरूंचे दर्शन घेतले. भाविकांच्या उत्साहाने आणि आरतीच्या गजराने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.त्रिपुरारी पौर्णिमा हा दत्तभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस असून,या दिवशी दीपदानाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.या पार्श्वभूमीवर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दिवे प्रज्वलित केले. काहींनी नदीकाठावर तर काहींनी मंदिर परिसरात दिवे लावून प्रभू दत्तात्रेयांच्या चरणी भक्ती व्यक्त केली.या दीपोत्सवामुळे नृसिंहवाडी परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण होते. स्थानिक ग्रामस्थांनी तसेच भाविकांनी मिळून स्वच्छता,शिस्त आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधला.त्रिपुरारी पौर्णिमेच्या या सोहळ्यामुळे नृसिंहवाडीतील कृष्णाकाठ पुन्हा एकदा भक्तीच्या प्रकाशाने उजळून निघाला.नागरिक,महिला मंडळी,युवक आणि बालकांनी या दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Leave a Comment

error: Content is protected !!