पुलाची शिरोली/ प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर टोप येथील बाजार कट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचार्यास रिकाम्या ट्रॅक्टर टाॅलीची धडक बसल्याने पादचारी जागीच ठार , बहिणीच्या घरी जात असताना अपघात झाला , मयत याचा काल सोमवारी वाढदिवस झाला अन नियतीने आज त्याच्यावर काळाचा घालून त्याचे प्राण हिरावून नेला.हा अपघात मंगळवारी सायंकाळी ६:३० वाजण्यासुमार घडला .घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की अपघात मयत व्यक्तीचे नाव अनंत नामदेव दरेकर ( वय ४१ रा विलासनगर शिरोली पुलाची ता हातकणंगले ) असे असून तो आज टोप ता हातकणंगले येथील आपल्या बहीणीकडे आला होता या दरम्यान तो रस्ता ओलांडत बहीणीच्या घरी जात असताना पुणेहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रॅक्टर टाॅली च्या मागील टाॅलीची धडक बसल्याने तो रस्त्यावर पडताच टाॅलीची चाके त्याच्या छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला .या अपघाताची माहिती मिळताच अनंत याची बहिणी व मित्रपरिवाराने घटनास्थळी धाव घेवून बहिणीने फोडलेला हंबरडा ह्रदय पिळून टाकणारा होता त्याच मित्रानी साजरा केल्याच्या वाढदिवसाच्या आठवणी सांगताना त्यांचा उर भरून आला . आपल्या मित्राच्या अशा अपघाती निधन मृत्यू होणे त्याना क्षणभर विश्वास बसेना . या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे