आगामी सर्वच निवडणुका ताकदीने लढवू – आमदार सतेज पाटील 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील आणि स्व.दलितमित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबीयांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या कार्यामुळे आज हा तालुका नंदनवन बनला आहे.या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका समविचारी नेत्यांच्या सोबतीने ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू, असा ठाम विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ,जयसिंगपूर नगरपरिषद तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली.यावेळी त्यांनी सर्वांची मते जाणून घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.आमदार सतेज पाटील म्हणाले की, सरकारने मतदार यादीत अनेक घोळ निर्माण केले आहेत.त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने सतर्क राहून मतदार नोंदणीचे काम काळजीपूर्वक पार पाडावे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आजपासूनच प्रत्येक कार्यकर्त्याने सत्तेच्या पुनरागमनासाठी जोरदार कामाला लागले पाहिजे.शिरोळ तालुक्यात सत्ता स्थापन करण्यासाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख सहकारमहर्षी गणपतराव पाटील,माजी खासदार राजू शेट्टी,माजी आमदार उल्हास पाटील आणि युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यासह समविचारी नेत्यांच्या सोबतीने ही निवडणूक लढवली जाईल, असे ते म्हणाले. गणपतराव पाटील म्हणाले की, “शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांत होणार आहेत. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या सोबतीने ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रयत्न करावेत.युवानेते पृथ्वीराजसिंह यादव यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “विजयासाठी संघटितपणे काम करून तालुक्यात पुन्हा सत्ता आणूया.”या बैठकीस तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!