स्मॅक भवन व इ एस आय रुग्णालयास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे भेटीवेळी स्मॅक अध्यक्ष राजू पाटील यांनी मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या समोरच औद्योगिक वसाहत मधील सुविधांचे तक्रारींचा वाचला पाढा
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुलाची शिरोली औद्योगिक वसाहत मधील शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन स्मॅक भवन व ई एस आय रुग्णालयास आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या भेटीवेळी औद्योगिक वसाहत मधील आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय, सुविधांबाबत अध्यक्ष राजू पाटील यांनी त्यांच्या समोरच तक्रारींचा पाढाच वाचला. शिरोली औद्योगिक वसाहत मधील एमआयडीसीच्या जागेमध्ये शिरोली ग्रामपंचायत कडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. त्यातून कामगारांसह कार्यालयास भेट देणाऱ्यांचे आरोग्यास धोका निर्माण होत आहे.या कचऱ्यामुळे उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय इ एस आय रुग्णालयात पाच वर्षापासून लोकल कमिटीच्या सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न गंभीर आहेत .रेफरल लेटर प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करून ती रुग्णालयात सुलभ करावी, शुगर तपासणी स्ट्रिप्स , औषधांचा अनियमित पुरवठा, दंत उपचारासाठी दीड महिन्याची प्रतीक्षा या समस्या भेडसावत आहेत .या समस्या वरती तातडीने तोडगा काढावा,अशी मागणी स्मॅक चे अध्यक्ष राजू पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचेकडे केली.शिरोली औद्योगिक वसाहत मधील ई एस आय रुग्णालय व स्मॅक कार्यालयाला मंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. त्यावेळी स्मॅक च्या वतीने अध्यक्ष राजू पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी या मागण्यावर लवकरच सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते नामदार प्रकाश आबिटकर ,खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांचा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास स्मॅक खजानिस बदाम पाटील, आयटीआय अध्यक्ष प्रशांत शेळके, सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक रणजीत जाधव, जयदीप चौगुले ,सुमंत पाटील यांच्यासह निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, भीमराव खाडे उद्योजक संजय भगत ,अमोल कामत, दिग्विजय पोतदार, राहुल करणे , महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. मिलिंद चौधरी उपस्थित होते.