कुरुंदवाड / प्रतिनिधी
दिवाळीचा फराळ घेताना चर्चा राजकारणावर होणारच.आवाडे आणि डांगे घराण्यांमध्ये नेहमीच सामाजिक व सहकार्याचं नातं राहिलं आहे. सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत मनिषाताईंनी 67 पेक्षा जास्त सभा घेतल्या होत्या.आता कुरुंदवाडच्या निवडणुकीत त्याची उतराई होईल असे ठामपणे आम.राहुल आवाडे यांनी सांगितले.कुरुंदवाड येथे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, दीपक गायकवाड रामचंद्र मोहिते यांनी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमात आम.आवाडे बोलत होते, या कार्यक्रमात आम.आवाडे यांनी सौ. मनिषा उदय डांगे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दांत पाठिंबा जाहीर करत “मनिषाताई माझी बहीण आहे, कुरुंदवाडच्या निवडणुकीत मी ताकदीनं प्रचार करणार,” अशी ठाम भूमिका मांडली.यावेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, “रामचंद्र डांगे यांचा स्वभाव आक्रमक असला तरी त्यांच्यातली माणुसकी मोठी आहे. त्यांनी नेहमी समाजकारण जपलं आहे. पदं येतात-जातात, पण डांगे नेहमी जमिनीवर राहूनच समाजसेवा करत आले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आम्ही नेहमी पाठिंबा देत आलो आणि पुढेही देऊ.यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे,भाजप नेते माधवराव घाटगे, माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सावकार मादनाईक आदींच्या उपस्थितीमुळे फराळ कार्यक्रमाला राजकीय रंग चढला.यावेळी स्वागत माजी नगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष रमेश भुजुगडे यांनी केले.या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, अक्षय आलासे, रमेश भुजुगडे, उमेश कर्णाळे, धनपाल पोमाजे, दीपक पोमाजे, सुरेश बिंदगे, दत्तात्रय कामत, प्रकाश आलासे, कुदरत भुसारी, अखिल गोलंदाज, चांद कुरणे, आदम मानगावे, सिकंदर कोठीवाले जुनेद कोठीवाले, रणजीत डांगे, शुभम जोग, मनीषाताई डांगे, भाजपाच्या उमा पाठक, यांच्यासह आदी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, आजी-माजी नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.