भरत बॅक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ‘भरत कॅश बॉण्ड’ योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद – ठेवी ३ कोटी ५० लाखांवर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

शिरोळ, इचलकरंजी,हातकणंगलेसह कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या भरत बॅक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या अग्रगण्य संस्थेने यंदा दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू केलेल्या ‘भरत कॅश बॉण्ड’ या ठेवी योजनेला ग्राहक आणि सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या योजनेअंतर्गत बँकेने ठेवीवर ८.६० टक्के उच्चांकी व्याजदर जाहीर केला असून अल्पावधीतच तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत.या ठेवींसह बँकेच्या एकूण ठेवींचा आकडा आता २९० कोटी रुपयांवर पोहोचला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्रीवर्धन पाटील यांनी दिली. समाजातील सर्व घटकांना आर्थिक कर्जपुरवठा करून त्यांचा व्यवसाय, शेती आणि घरगुती प्रगतीस हातभार लावणारी बँक म्हणून भरत बॅकने ठोस स्थान निर्माण केले आहे.बँकेकडून वाहन, तारण, कृषी योजना, घर बांधणी, मशिनरी तसेच सोने तारण कर्ज अशा विविध योजनांमधून कमीतकमी कागदपत्रांमध्ये आणि जलद गतीने वित्तपुरवठा केला जात आहे. तसेच बँकेमध्ये एटीएम, गुगल पे, डिजिटल बँकिंग यांसारख्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध असून शंभर टक्के सुरक्षिततेमुळे ग्राहकांचा आणि सभासदांचा विश्वास अधिक दृढ होत आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.दरम्यान, सहकार क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणारी भरत बॅक ही बँक “विश्वास, सुरक्षितता आणि सेवाभाव” या तत्त्वावर कार्यरत असल्याचे सांगून बँकेचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर, शिरोळ,गणेशवाडी,नृसिंहवाडी, नांदणी,टाकळी,हेरले आणि पेठवडगाव येथील शाखांना भेट देऊन योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!