शिरोळच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या कामगारांची सौ.सारिका अरविंद माने यांनी केली दिवाळी गोड 

Spread the love

सौ.सारिका अरविंद माने परिवाराकडून फराळ व बोनसचे वाटप

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहराची स्वच्छता,सुंदरता आणि आरोग्य यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या नगरपालिकेच्या कुशल व अकुशल कामगारांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक आनंदाची भेट देण्यात आली.सौ.सारिका अरविंद माने परिवाराच्यावतीने या कामगारांना दिवाळी फराळ किट व बोनस वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.सणासुदीच्या दिवसात इतर सर्वजण कुटुंबासह सण साजरा करतात, मात्र कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्यरत असलेले नगरपालिकेचे सफाई कामगार मात्र शहर स्वच्छ ठेवण्यात अहोरात्र झटत असतात. त्यांना सणांमध्ये देखील सुट्टी मिळत नाही. त्यांचा हा त्याग लक्षात घेऊन सारिका अरविंद माने यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,सौ.सारिका माने,डॉ.अरविंद माने,माजी नगरसेवक,पदाधिकारी आणि अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सफाई कामगारांना फराळ किट व बोनस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आमदार दलित मित्र डॉ.अशोकराव माने म्हणाले,शहर स्वच्छ ठेवण्याचे प्रामाणिक व कठीण काम या सफाई कामगारांच्या माध्यमातून होत आहे.त्यांच्या परिश्रमामुळेच शहरातील रोगराई दूर राहते आणि नागरिकांना आरोग्यपूर्ण वातावरण लाभते. त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाने या कामगारांचा सन्मान करणे आवश्यक आहे.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले,शिरोळ शहराच्या सौंदर्य आणि स्वच्छतेत सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या परिश्रमांमुळेच शिरोळ शहराला स्वच्छ भारत अभियानात सन्मान मिळवता आला आहे.या कामगारांच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.त्यांच्या हक्कांच्या आणि कायमस्वरूपी नोकरीसाठी पुढील काळात प्रयत्न सुरू राहतील.सौ.सारिका माने यांनी यावेळी सांगितले की,कामगार हे आपल्या समाजाचे खरे हिरो आहेत.दिवाळीच्या या सणात त्यांना आनंद देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.त्यांच्या चेहऱ्यावर आलेले हास्यच आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे.या उपक्रमामुळे सफाई कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.आपल्या कामाचा सन्मान होत असल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती.समाजातील या दुर्लक्षित घटकांपर्यंत आनंद पोहोचवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद गावडे, माजी नगरसेवक श्रीवर्धन देशमुख, शिवाजीराव माने देशमुख, शिवाजीराव सांगले,भाजपा तालुकाध्यक्ष महेश देवताळे,हाजी बाळासाहेब शेख, विश्वजीत संकपाळ,दादासो कोळी,नरेंद्र माने,संभाजी भोसले,दादासो आवळे, सुशिला पाटील,प्रकाश कांबळे,सागर कोळी,बबन बन्ने,आदित्य माने, राघव सुतार,अमरजित कोगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!