पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
जठारवाडी गावातील ओढ्यात पडून एका मनोरुग्ण पुरुषाचा मृतदेह चढलेल्या अवस्थेत सापडला त्याचे नाव सतीश धवन वय 35 राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतीश धवन काही दिवसांपासून जठारवाडी मध्ये भटकंती करत होता तेथील वाकोबाच्या मंदिरात राहत होता पोटाला काही न मिळाल्याने तो पाणी पिण्यासाठी ओढ्यावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. त्याचा उपास मारणे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख पटली पोलिसांनी पंचनामा करून मृत देह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला.