पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
येथील राष्ट्रसेवा प्रशालेत पोक्सो ,सायबर क्राईम व वाढती बाल गुन्हेगारी याविषयी सपोनि सुनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन.विद्यार्थी सुरक्षा या उपक्रमांतर्गत राष्ट्रसेवा प्रशाला पुलाची शिरोली येथे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गायकवाड यानी पोक्सो ,सायबर क्राईम व वाढती बालगुन्हेगारी याचे परिणाम तसेच समाजामध्ये वाढत असणारी लैंगिक गुन्हेगारी ही खूप मोठी समस्या बनलेली आहे.मुलींची सुरक्षा हा प्रश्न सध्या ऐरणी वर आलेला आहे .त्यामुळे शालेय शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलांच्या मध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे . यासाठी कायद्याने गंभीर अशी शिक्षेची तरतूद केली असल्याची माहिती गायकवाड यांनी सांगितली . तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी अस्तित्वात असणाऱ्या विविध कायद्यांची ओळख,सोशल मीडियाचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या कडून होणारे सायबर क्राईम व समाजामध्ये वाढत असणारी बाल गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनलेला आहे असे ते म्हणाले .किशोरवयीन मुले बाल गुन्हेगार बनल्यामुळे कुटुंबाचे , समाजाचे व राष्ट्राचे आर्थिक व नैतिक नुकसान होते आहे. शाळेने घेतलेला सदर उपक्रम हा खूपच स्तुत्य असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पाटील होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए .पी .चौगुले यांनी केले तर सूत्रसंचालन सौ कुंभार एस . एस .यांनी केले. आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले.याप्रसंगी श्री . सी बी .कुंभार श्री संग्राम भूयेकर ,सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .