आर.आर.पाटील सुंदर गाव स्पर्धेत शिरोली पुलाची ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम क्रमांकासह दहा लाखाचे बक्षीस प्राप्त
पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
माजी ग्राम विकास मंत्री आर .आर. पाटील (आबा) सुंदर गाव स्पर्धेत हातकणंगले तालुक्यात शिरोली पुलाची ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकसह दहा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या सुंदर गांव पुरस्कार योजनेंतर्गत कामकाज वर्ष सन 2022- 2023 पुरस्कार वर्ष 2023- 2024 व कामकाज वर्ष सन 2023- 2024 पुरस्कार वर्ष 2024-2025 मध्ये निवड झाली.आर.आर.(आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना जिल्हास्तर व तालुकास्तरीय ग्रामपंचायत पुरस्कार व बक्षिस वितरण समारंभ सोमवारी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे व जिल्हाचे पालकमंत्री मा नामदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व खासदार धनंजय महाडिक , आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजीराव पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील आनंद भवन, सायबर महाविद्यालय येथे कार्यक्रम पार पडला यावेळी शिरोली पुलाची ग्रामपंचायतीस हातकणंगले तालुकास्तरीय प्रथम क्रमांक घोषित करत दहा लाखाचे बक्षीस देण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ पद्मजा करपे, उपसरपंच श्री विजय जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुरस्कार स्वीकारला .यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेएन , गटविस्तार अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, गटविकास अधिकारी श्री ए एस कटारे, ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम , माजी उपसरपंच कृष्णात करपे सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.