सावर्डे / प्रतिनिधी
सावर्डे ता. हातकणंगले येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल रुक्मिणी मोठ्या भक्ती भावाने व प्रसन्न वातावरणात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन.सावर्डे येथील विठ्ठल मंदिर हे पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणारे मंदिर आहे या मंदिरात आज आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच रांग लागली होती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती अतिशय सुंदर सजवण्यात आली होती हे सजवण्याचे काम विठ्ठल भक्त राजू पाटील यांनी केले होते यावेळी मंदिराच्या परिसरात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भजनाच्या कार्यक्रमांमध्ये गावातील महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या द्वादशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे संयोजकाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे तसेच विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा सजवून गावातून मिरवणूक संवाद्य काढण्यात आली यावेळी गावातील विठ्ठल भक्त या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तसेच या मिरवणुकीमध्ये विविध शाळातील विद्यार्थीही सहभागी झाले होते यामध्ये प्राथमिक शाळा व आर वाय पाटील हायस्कूल चे काही विद्यार्थी तसेच आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने आषाढी एकादशी व उत्साहात साजरी करण्यात आली.