श्री पाराशर हायस्कूल पारगाव येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री पाराशर हायस्कूल पारगाव ता. हातकणंगले येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विद्यार्थी विद्यार्थिनींनी टाळ मृदंगाच्या निनादात गावातून विठोबाचा गजर करत मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा संपन्न केला.यामध्ये विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीयन पध्दतीच्या साड्या परिधान केल्या होत्या व विद्यार्थी मित्रांनी पांढरा शर्ट पायजमा टोपी परिधान करून हातामध्ये टाळ घेऊन विठ्ठल नामाचा ज्ञानोबा तुकाराम जप करीत गावातून मिरवणूक काढली या दिंडीमध्ये सर्व शिक्षक , शिक्षिका कर्मचारी सहभागी झाले होते दिंडीचा शेवट ग्रामदैवताच्या पुढे येऊन विद्यार्थ्यांनी शिक्षिका मनसोक्त रिंगण सोहळा घेऊन अभंगातून विठ्ठलाचा गजर केला आणि इथेच दिंडी सोहळ्याची सांगता समारंभ केला दिंडी सोहळ्याच्या सुरुवातीला पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून पूजन करण्यात आले हे पूजन विद्यालयातील जेष्ठ लिपिक श्री निवृत्ती शेलार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक एन. आर. यादव सर प्रवेशिका सौ रोकडे मॅडम बी. एस. मोरे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनीं सहभागी झाले होते.

error: Content is protected !!