पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी प्रभाग क्रमांक दोन मधील सदस्य विजय बंडा जाधव यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.पद्मजा करपे या होत्या.शिरोली ग्रामपंचायत वर आमदार अमोल महाडिक गटाची सत्ता आहे गटांतर्गत प्रत्येक वर्षी नवीन उपसरपंच निवड करण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार शिवसेना उ .बा ठा. गटाचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी साडेअकराच्या सुमारास आमदार महाडिक यांनी विजय जाधव यांना उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले.त्यानुसार जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.विजय जाधव हे यापूर्वीही या प्रभागातून विजयी झाले होते.तसेच त्यांच्या पत्नी सौ. माधुरी जाधव ही विजयी झाल्या होत्या.त्यामुळे विजय जाधव यांची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित झाले होते.निवड होताच फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून जाधव यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.नूतन उपसरपंच जाधव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी माझी उपसरपंच कृष्णात करपे वडगाव बाजार समिती चे सभापती सुरेश पाटील सलीम महात राजेश पाटील महंमद महात बाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, उद्योजक सलीम महात, डॉ. सुभाष पाटील, सुरेश पाटील, कृष्णात करपे, योगेश खवरे, बाळासाहेब पाटील, धनाजी पाटील, उद्योजक योगेश खवरे ,श्रीकांत कांबळे, महादेव सुतार, आरिफ सर्जेखान , अविनाश कोळी ,सतीश पाटील, प्रकाश कौंदाडे, सदाशिव संकपाळ,ग्रामपंचायत सदस्य सौ.कमल कौंदाडे , सौ.सुजाता पाटील, सौ. मनीषा संकपाळ, कु. हर्षदा यादव, सौ. कोमल समुद्रे, वशिफा, नाजीया देसाई पटेल यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व महाडीक गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.विषय वाचन ग्रामपंचायत अधिकारी सौ. गीता कोळी यांनी केले आभार मावळते उपसरपंच बाजीराव पाटील यांनी मानले.