१ जुलै डॉक्टर डे, कृषी दिन आणि डॉ सुभाष पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शिरोली डॉक्टर असोसिएशन (SDA) शिरोली केमिस्ट असोसिए असोसिएशन संशोधक व उपजीविका तज्ञ डॉ योगेश फोंडे आणि बाप्पा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप शिरोली गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक राधा मेडिकलचे संदीप पाटील यांनी केले तर आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष योगेश खवरे यांनी डॉक्टर असोसिएशन ने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कामामध्ये, शिरोली परिसरामध्ये आलेल्या महापुरामध्ये शिरोलीसह हालोंडी भागात, हायवे वरती मेडिकल कॅम्प लावून मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या ,तसेच दरवर्षी वृक्षारोपण करतच असतो पण यात्रा काळात असोसिएशन मार्फत केमिस्ट यांच्या मदतीने संपूर्ण गाव स्वच्छ करण्याची मोहीम पण राबवली होती त्याचा आवर्जून उल्लेख केला कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद भाऊे खवरे मनोगतामध्ये डॉक्टर असोसिएशन बरोबर प्रत्येक सामाजिक कार्यात केमिस्ट असोसिएशन हिरारीने भाग घेऊन मोफत औषध पुरवठा हरियाणा करण्यात शिरोली केमिस्ट असोसिएशन एक पाऊल पुढे असते नमूद केले, त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील आपल्या मनोगतामध्ये शिरोली मध्ये जिथे जिथे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी हा या सर्वांच्या मदतीने हिरवीगार शिरोली करूया अशा म्हणून हा संस्थाना शुभेच्छा दिल्या, वडगाव मार्केट कमिटी सभापती सुरेश पाटील यांनी ह्या कौतुकास्पद संघटनेच्या कामाला शुभेच्छा देऊन गावातील सर्व शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये मोफत झाडे पुरवण्याचे आव्हान केले, सरपंच प्रतिनिधी कृष्णात करपे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देऊन गावांमध्ये असे कार्यक्रम होतात त्यामुळे आमच्या गावाची प्रगती होते त्यामुळे गावाच्या विकासात अशा संस्थेचा उल्लेखनीय सहभाग आहे याचा उल्लेख केला, आभार मानताना डॉक्टर सुभाष पाटील यांनी झाडांचे पर्यावरण जोपासण्याच्या दृष्टीने सर्वांना ऑक्सिजन पुरवण्याच्या दृष्टीने प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले आणि आजच्या हा वृक्षारोपण चळवळ घराघरात राबवून शिरोली मध्ये जवळजवळ एक व्यक्ती एक झाड असे 25 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्टे आहे सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले आणि उपस्थितांचे अभिनंदनही केले. आभार प्रदर्शन डॉक्टर अमोल तावडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर निनल मणियार, डॉक्टर समर् पद्मायी, डॉक्टर अक्षय हिरेमठ डॉक्टर सुयोग मणियार डॉक्टर प्रशांत पाटील तसेच केमिस्ट असोसिएशनचे संदीप पाटील हर्षल मणियार आणि विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमास डॉक्टर असोसिएशनचे सीनियर डॉक्टर बी ए पाटील सर डॉक्टर अन्वर गंजली सर डॉक्टर ओंकार पाटील सर डॉक्टर तानाजी यादव डॉक्टर अभिषेक पुजारी, डॉक्टर श्रीनिवास पाटील तसेच केमिस्ट असोसिएशनचे महेश बुटाले स्वप्निल कदम प्रशांत परीट अभिजीत चौगुले यांच्यासह सर्व डॉक्टर केमिस्टमंडळी तसेच गावातील गावकामगार राजेश पाटील उद्योगपती सलीम महात राष्ट्रसेवेचे संजय पाटील शिरोली विकास चे निवास कदम डेप्युटी सरपंच बाजीराव पाटील ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे, उद्योगपती राजू सुतार, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव आरिफ सर्जेखान मोहम्मद महात महादेव सुतार आनंदा चौगुले सचिन गायकवाड संदीप तानवडे शिरोली हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थी आणि गावातील अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी नोंदणी करून ज्यांना ज्या प्रकारची झाडे हवे आहेत त्या प्रकारची झाडे घेण्यासाठी गर्दी केली होती. झाडामध्ये फणसंबा पेरू चिकू वर्ड पिंपळ जांभळ सुपारी मोहगणी चाफा बकुळा अशा अनेक निसर्ग संवर्धन करणाऱ्या व ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या रोपांचे वाटप करण्यात आले.शिरोली ग्रामपंचायत कोळी मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला.