कुरुंदवाड / प्रतिनिधी
सभासदांच्या सहकार्यामुळे अहवाल सालात बँकेचा व्यवसाय 619कोटी 52 लाखावर पोहोचला आहे. नियोजनबद्ध वसुलीमुळे ‘नेट एन.पी.ए.’ 0 टक्के राखण्यात यश आले आहे.त्यामुळे यावर्षी सभासदांना 12 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेअरमन प्रदीप पाटील यांनी सांगितले.
तेरवाड ता.शिरोळ येथील श्री.पांडुरंग सांस्कृतिक भवनात आयोजित स्व.से.कै.श्रीपाल (काका) आलासे कुरुंदवाड अर्बन बँकेच्या 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सभेच्या प्रारंभी दिवंगत जवान, शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्व. श्रीपाल (काका) आलासे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सभेत पुढे बोलताना चेअरमन पाटील यांनी बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावा सादर केला.2024-25 या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी 380 कोटी 94 लाख 36 हजार रुपयांवर, एकूण कर्जवाटप 238 कोटी 11 लाख, निव्वळ नफा 3 कोटी 18 लाख 13 हजार तर ढोबळ नफा 5 कोटी 65 लाख 31हजार रुपये इतका झाला आहे. बँकेचे भागभांडवल 16 कोटी 36 लाख 77 हजार, राखीव व इतर निधी 27कोटी 55 लाख 37 हजार, गुंतवणूक 160 कोटी 35 लाख असून, खेळते भांडवल 443 कोटी 27 लाख 51 हजार रुपये आहे.स्वनिधी 43 कोटी 92 लाख 14 हजार असून एन.पी.ए.0 टक्के राखून ‘अ’ वर्गाचे ऑडिट कायम राखण्यात आले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम ऱ्हटोळे,व्हा. चेअरमन सुधाकर पाटील, संचालक अरुण आलासे, मोन्नाप्पा चौगुले, भरत चौगुले, महावीर थोटे, बाळासाहेब नाईक यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक चेअरमन पाटील यांनी केले.
सभेला संचालक इकबाल पटवेगार,रेश्मा पाटील,निखिल आलासे, नंदकुमार पाटील,लक्ष्मण चौगुले,सुनील पाटील, ओंकार माळी,सचिन कठारे,सुजाता भबीरे,दिपाली पाटील, पंकज पाटील,सुनील जीवाजे,अर्जुन हराळे,तसेच संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. आभार महादेव धनवडे यांनी मानले.