पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
व्यक्ती वस्तू परिस्थिती भूतकाळ वर्तमानकाळ यावर अवलंबून न राहता नेहमीच आनंदित रहा. आत्मद्यानशिबिराचे प्रमुख संजीव कुलकर्णी
आज आज शिरोली फुलाची कालिका मंगल कार्यालय येथे आत्मद्यान शिबिर 282 व बाप्पा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्साहात सादरीकरण झाले. त्यावेळी मार्गदर्शक सिद्ध समाधी योगाचे व आत्मद्यान शिबिराचे प्रमुख संजीव कुलकर्णी मार्गदर्शन करताना बोलत होते. कुलकर्णी सरांनी अष्टांग योगाची माहिती सांगताना यम म्हणजे अहिंसा, सत्य , असतेय, ब्रह्मचार्य, अपरिग्रह या सामाजिक आचारसंहिता सुदृढ राहण्यासाठी करावयाचे नियम म्हणजे वैयक्तिक आचारसंहिता सदृढ राहण्यासाठी झोपायचे वैयक्तिक नियम जसे शौच , संतोष, तप, स्वाध्याय, आणि ईश्वरप्राणीधान याचे विस्तृत वर्णन करून शहराच्या पूरक हालचाली बैठी असणे झोपून असणे सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके घेतली.त्याच बरोबर रजत हास्य योगाचे हुपरीचे हास्य योगातज्ञ घनश्याम आचार्य यांनी आजच्या धकधकीच्या जीवनात हास्याला किती महत्त्व आहे हे विविध प्रात्यक्षिक आधारे सर्वांचा सहभाग घेऊन करून दाखवले, त्याचबरोबर सेंद्रिय शेती व संवर्धन आणि आयुर्वेद याची सांगड घालून हसत हसत आरोग्य कसे सुधारावे याचे आरोग्य शिक्षण दिले.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव,भाजप नेते आणि गावकमंगार पाटील राजेश पाटील,मा.सरपंच तात्यासो पाटील,मा.सरपंच अनिल शिरोळे, उद्योगपती अविनाश मुखरे भाजप नेते दिलीप शिरोले राष्ट्रसेवा युवक संघटनाअध्यक्ष अध्यक्ष संजय पाटील आत्मज्ञान शिबिराचे स्वरूप करपे, कुलदीप चौगुले, सुशांत चौगुले,उद्योगपती शिवाजी पवार पाटील, उद्योगपती जयसिंग चौगुले,शशांक पिस्ते,उद्योगपती राजेंद्र सुतार,ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कौंदाडे आणि बाप्पा फाउंडेशनचे डॉक्टर सुभाष पाटील यांच्यासह गावातील मोठ्या प्रमाणात योगसाधक लहान मुले आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी कालीका मंगल कार्यालयाचे मालक अविनाश मुखरे तसेच मनोज चौगुले, स्वरूप करपे यांनी विशेष परिश्रम घेतले.