शिरोळ / प्रतिनिधी
आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांचे वडील व प्रतिष्ठित नागरिक ह.भ.प.दरगु दत्तू चुडमुंगे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी बुधवार दिनांक 18 जून 2025 रोजी निधन झाले.त्यांचा जन्म 1934 चा होता.तरुण वयात कुस्ती पट्टू होते. नंतर किराणा दुकान व्यवसायात त्यांनी यश मिळवले होते.नंतरच्या काळात त्यांनी40 वर्ष वारकरी संप्रदयात घालवली होती.निर्व्यसनी आणि शाकाहारी राहिल्यामुळे त्यांची प्रकृती चांगली होती.त्यांना तीन मुले आणि एक मुलगी सुना जावई नातवंडेअसा मोठा परिवार होता.रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक 19 जून 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजता पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.