Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त बजरंग दलाच्या वतीने सोमवारी सायंकाळी श त्रिशूल दिक्षा व शौर्य ध्वज संचलन करण्यात आले. शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराजवळ भगव्या ध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते हातात भगवे ध्वज डोक्यावर भगवी टोपी व गळ्यामध्ये त्रिशूलधारी स्कार्फ परिधान करून सहभागी झाले होते.

 

 

 

योगेश खाडे, राहुल खवरे, उत्तम पाटील,निलेश शिंदे,श्रीकांत कदम ,शुभम पाटील ,अदित्य पाटील ,ओंकार रंगापुरे यांच्या सह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!