शिरोलीत महिलेची भाड्याच्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

 

पुलाची शिरोलीत सौ. प्राजक्ता सुनील गुरव (वय.३९, रा.वाघोली, जिल्हा सातारा) हिने भाड्याच्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी चार च्या सुमारास उघडकीस आली. अधिक माहिती अशी, पुलाची शिरोलीतील जय शिवराय तालीम शेजारी तानाजी पोवार यांच्या घरी प्राजक्ता, पती सुनील आणि मुलगा तिघेजण गेली ४ वर्षा पासून राहत होते.पती आणि मुलगा दोघे कामावर जात होते तर प्राजक्ता घरी होत्या. प्राजक्ता आणि पती सुनील यांच्यात वारंवार किरकोळ वाद होत होते. या वादाला कंटाळून शुक्रवारी दुपारी प्राजक्ता यांनी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मुलगा कामावरून घरी आल्यावर उघडकीस आली. यानंतर मुलग्याने वडीलांना फोन करून बोलावून घेतले. या नंतर शिरोली पोलीस घटनास्थळी आले. प्राजक्ता यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

error: Content is protected !!