आ. डॉ अशोकराव माने यांनी जनसेवेचे व्रत जोपासले : आ. विनयराव कोरे
शिरोळ / प्रतिनिधी
कोणत्याही क्षेत्रात आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या आयुष्याची झीज झालेली असते अशा काळात आपण केलेल्या कार्यास शाबासकीची थाप मिळाली की आपलं आयुष्य सार्थक होतं हे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान आणि शिरोळ नागरिकांच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिरोळभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातून दिसून आले. राजकारण व सामाजिक कार्यात जनसेवेच व्रत प्रामाणिक जोपासू नीतिमत्तेने काम केल्यास माणूस मोठा होतो हे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दाखवून दिले असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील भाजी मंडई येथे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान व शिरोळ नागरिकांच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिरोळभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. माजी मंत्री व आमदार डॉ विनयराव कोरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. सौ. निशिगंधा वाड आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहापासून ते कार्यक्रमास्थळापर्यंत शिरोळभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि प्रमुख पाहुण्यांची हालगी धनगरी ढोल कैताळ तुतारी या पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि शोभेच्या दारूची आतिषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका श्रीमती पुष्पा दत्त कळेकर आणि शिरोळ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ भारती सुनील कोळी यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह मानाचा फेटा शाल देऊन शिरोळभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दलितमित्र डॉ अशोकराव माने यांना आमदार करण्याचा शब्द पूर्ण केल्याबद्दल माजी मंत्री व आमदार डॉ.विनयराव कोरे यांचा शिरोळकर नागरिकांच्यावतीने मानपत्र सन्मानचिन्ह मानाचा फेटा शाल देऊन कृतज्ञपूर्वक नागरी सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने व सौ रेखादेवी माने यांचाही सत्कार शुभेच्छा देण्यात आल्या.
आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने प्रास्ताविकात म्हणाले की कर्तबगार मान्यवरांनी केलेल्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी गेल्या अकरा वर्षापासून शिरोळभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्याचबरोबर या व्यासपीठावरवरून समाजप्रबोधन होणारे कार्यक्रम आयोजित करून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिरोळ परिसरात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती पुष्पा कळेकर सौ भारती कोळी यांचा सन्मान करण्याचे भाग्य मिळाले. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम दिलं नेतेमंडळींनी आशीर्वाद दिला आणि आमदार डॉ. विनयराव कोरे यांनी खंबीर साथ दिल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याला आमदार होता आलं. यामुळे सर्वांच्या ऋणात राहून यापुढेही काम करत राहू.
या समारंभात बोलताना माजी मंत्री व आमदार डॉ विनयराव कोरे म्हणाले की आपल्या आयुष्यात वेगळं काम करून समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या भूमिपुत्रांचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या कर्तुत्वान कार्याची जाणीव करून देण्यासाठी शिरोभूषण पुरस्कार दिला जातो. गाव माझं मी गावाचा ही भूमिका घेऊन शिरोळकर नागरिक काम करत असतात. त्यामुळे आपल्या भूमिपुत्राचा गौरव करण्यासाठी या व्यासपीठावर एकत्र आले आहेत. कठोर आणि खडतर परिश्रम घेऊन शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल घडवण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा स्त्रीशक्तीचा सन्मान आजच्या पुरस्कारातून होत आहे. कर्तबगार व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा आजच्या युवकांना होण्यासाठी असा सोहळा होणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकारण विहिरीत पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याचे पाहून समाधान लाभते. सर्वसामान्य कुटुंबातील धडपडणारा कार्यकर्ता दलितमित्र डॉ अशोकराव माने हे आमदार व्हावेत असे स्वप्न या तालुक्याचे आमदार स्वर्गीय देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पाहिले. यासाठी त्यांनी अशोकरावांना साथ दिली. बापूंनीही राजकीय सामाजिक क्षेत्रात जनसेवेचे व्रत स्वीकारून काम करत राहिले जनतेनेही त्यांना भरभरून प्रेम दिलं. बापू आमदार व्हावेत अशी शिरोळ तालुक्यातील जनतेचे स्वप्न होते. त्यामुळे हातकणंगले तालुक्यातून त्यांना आमदार करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांचे नेतेमंडळींचे आशीर्वाद मिळाले जनतेचे पाठबळ आणि त्यांच्या कार्यामुळे त्यांना आमदार करण्याचे स्वप्न पूर्ण करता आलं. शिरोळकरांनी माझा केलेला सत्कार करत असलेल्या कार्याला निश्चितपणे प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. सौ. निशिगंधा वाड बोलताना म्हणाले की ज्ञानार्जन करताना आयुष्याच्या विद्यापीठात माणसं वाचायला शिकवते. समाजात कसं वागायला पाहिजे हे शिकवले जाते. त्यामुळे विविध क्षेत्रात काम करत असताना आपल्या कर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटविला जातो. अशा कर्तबगारांचा गौरव होणे गरजेचे आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत आज दोन नारीशक्तीचा त्यांनी केलेल्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी शिरोळभूषण पुरस्कार दिला जातो. याचा स्त्री म्हणून सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे प्रेरणादायी कार्य अनुकरणीय आहे. असे सांगून त्यांनी आजचा समाज कसा बदलत आहे याविषयी मार्गदर्शन केले.
शिरोळभूषण पुरस्कार प्राप्त सौ भारती कोळी व श्रीमती पुष्पा कळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना मिळालेल्या पुरस्कारामुळे केलेल्या कार्याची पोच पावती मिळालीच पण इथून पुढेही काम करत असताना जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार काम करण्यासाठी निश्चितपणे ऊर्जा देईल असे सांगितले. शांभवी माळकर, प्रज्ञा माळकर, सौ. जयश्री पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय खातेदार यांनी आभार मानले.
यावेळी प्रद्मश्री विजय शहा, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ नीता माने, सौ रेखादेवी माने, माजी नगरसेवक डॉ अरविंद माने, सौ. सारिका माने, केडीसी बँकेचे संचालक विजयसिंह माने, माजी आमदार उल्हास पाटील, शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले, विजय भोजे, प्रसाद खोबरे, सौ इंद्रायणी पाटील,गुरुदत्त शुगर्सचे संचालक शिवाजीराव माने देशमुख, शिवाजीराव जाधव सांगले, युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, माजी सरपंच गजानन संकपाळ, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक सुभाषसिंग रजपूत, शिरोळभूषण धनाजीराव पाटील नरदेकर, दिलीपराव माने, बजरंग काळे, सुहास राजमाने, डॉ.दगडू माने, बबन बन्ने, सागर कोळी, डॉ अभिजीत माने विजयसिंह माने देशमुख, दादासाहेब कोळी, अविनाश उर्फ पांडुरंग माने, संजय शिंदे, गोरखनाथ माने, विजय आरगे, अविनाश टारे, बाळासाहेब खोंद्रे, प्रमोद भोसले, श्रीवर्धन माने देशमुख, एन वाय जाधव, दयानंद जाधव, तातोबा पाटील, किरण गावडे, दादासो इंगळे, चंद्रकांत कोरे, चंद्रशेखर कोळी, विजय कोळी,आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते .