आ.डॉ.अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. अरविंद माने यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व शिरोळचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेंना आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. 

आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.आमदार डॉ माने यांचे सुपुत्र माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांनी शिरोळ शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेंना गरजेनुसार शैक्षणिक साहित्य वाटप केले.येथील दत्तनगरमधील कुमार केंद्रीय शाळा दत्तनगर या शाळेत स्मार्ट टीव्ही देण्यात आला.आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक नामदेव सन्नके व शिक्षकांच्याकडे टीव्ही प्रदान करण्यात आला.यावेळी बाजीराव कोळी चंद्रकांत भाट,सचिन शिंदे भाट,प्रीतम गवंडी,युवराज पाटील,महेश कांबळे, विनायक गंगधर आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!