पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात शंभूराजे सेवा फौंडेशनच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मूर्तीस अभिषेक व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.दरम्यान संयुक्त छञपती शिवाजी नगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराजांच्या मूर्तीस अभिषेक शंभूराजे सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित मणियार यांचे हस्ते घालण्यात आला.
छत्रपती शिवाजी नगर येथे माजी सरपंच शशिकांत खवरे, माजी उपसरपंच कृष्णात करपे उद्योजक राजेश यादव, माजी जि.प.सदस्य महेश चव्हाण, सुरेश यादव, दिपक यादव, योगेश खवरे, रणजित कदम आदींच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास सरपंच सौ. पद्मजा करपे,उपसरपंच बाजीराव पाटील, डॉ.निनल मणियार, सतिश पाटील, विजय जाधव, संपत संकपाळ ,माजी उपसरपंच कृष्णात करपे, ग्रामपंचायत सदस्य महादेव सुतार,आरीफ सर्जेखान, बाळासाहेब पाटील, योगेश खवरे, बटेल देसाई,शिरोली डॉक्टर व मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,ग्रामविकास अधिकारी गीता कोळी, अर्जुन चौगुले, प्रतीक करपे,सलीम महात आदी उपस्थित होते.
फौंडेशनचे उपाध्यक्ष संदीप पाटील, रोहन तानवडे, हर्षल मणियार, सिद्धांत सनदे, सुनील जाधव, प्रतीक डिसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.