टोप येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

 

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 368 वी जयंती निमित्त टोप येथील प्रौढ प्रताप पुरंदर,करवीर प्रांत याच्या मार्फत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी मारुती मंदिर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.

 

तर सायंकाळी ७ वाजल्यापासून गावातून मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराजाच्या मूर्तीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.यावेळी वाशी नवी मुंबई येथील जय जिजाऊ लेझिम पथक मिरवणुकीचे आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला यामध्ये ५० तरुणीचा सहभाग होता.यामध्ये लेझिम सह महीलाच्यावर होणाऱ्या अत्याचारात पथनाट्य ही करण्यात आले. टोप नगरीतील अनेक महिला हे लेझिम पथक पाहण्यासाठी मुख्य मार्गावर मोठी गर्दी केली होती.यावेळी विविध मान्यवरांसह, प्रौढ प्रताप पुरंदर,करवीर प्रांत चे धारकरी व टोप गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!