श्रीदत्त विद्यामंदिर नृसिंहवाडीचा 95 टक्के निकाल, विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी.

मार्च 2025मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इ.10वी) श्रीदत्त विद्यामंदिर हायस्कूल नृसिंहवाडीचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. शाळेने 95 टक्के निकाल प्राप्त केला असून, शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची नवी परंपरा स्थापित केली आहे.

 

 

विद्यालयातील गुणानुक्रमे पहिले तीन विद्यार्थी प्रतिक्षा प्रशांत कोडणीकर 86.40 टक्के, श्वेता परमानंद सुंकी 82.60 टक्के,सुप्रिया जगदीश त्रिमुखे 78.40 टक्के असे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.हे यश विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे मिळाले आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुधीर वाडीकर यांचा मार्गदर्शनाचा हात विद्यार्थ्यांवर कायम राहिला,

 

 

तसेच संबंधित वर्गशिक्षक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली आहे.शाळेतील शिक्षकेत्तर कार्यक्रम, शालेय उपक्रम, आणि शिक्षणातील नवे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मदत करत आहेत. मुख्याध्यापक वाडीकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी शिक्षकांचा योगदान अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाची गोडी सर्व शिक्षकांना मिळाल्याचे सूचित केले.

 

 

 

शाळेच्या यशासाठी सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थ्यांचे पालक, तसेच स्थानिक समाजाचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.शाळेच्या यशामुळे नृसिंहवाडीतील शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!