पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली ग्रामपंचायतच्या यात्रा व उरूस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, श्री काशिलिंग बिरदेव व म्हसोबा त्रैवार्षिक जळ यात्रा निमित्त आयोजित प्रथम क्रमांकाचे कुस्ती दंगलीत शिवराम दादा पुणे आखाड्याचा मल्ल शुभम सीधनाळे यांनी छत्रपती शिवराय कुस्ती संकुल कुर्डूवाडी चा मल्ल महारुद्र काळेल यास आसमान दाखवले तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे चा सुहास घोडके यांनी शाहूपुरी तालमीचा मल्ल गणेश कुंकले याच्यावरती विजय मिळवला तर महिलांचे एकमेव कुस्तीमध्ये शिरोलीच्याच जिया सनदे हिने मौजे वडगाव च्या मानसी साळवी याचा पराभव केला. या कुस्ती दंगलीचे उद्घाटन व बक्षीस वितरण माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच बाजीराव पाटील, सुरेशराव पाटील, अविनाश कोळी, डॉ. सुभाष पाटील,निवास कदम, प्रकाश कौदाडे,राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अन्य कुस्त्या मध्ये श्रीमंत भोसले, शशिकांत बोंगार्डे, राघू शिंदे, वैभव यादव, रामा माने आर्यन रानगे, आदिल नायकवडे आदेश तिरपने ,कार्तिक रांनगे, इरफान आली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला. विजेत्या प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सिधनाळे यास अनिल कोळी यांचे स्मरणार्थ अभिजीत कोळी यांच्याकडून एक किलो चांदीची गदा तर बापूसो गावडे यांचे स्मरणार्थ अँड.रणजीत गावडे यांच्याकडून चषक तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये विजेत्या मल्लास शामराव पाटील यांचे स्मरणार्थ उपसरपंच बाजीराव पाटील यांच्याकडून चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. विजेत्या मल्लांना माजी आमदार महादेवराव महाडिक उपसरपंच ,कृष्णात करपे, सुरेशराव पाटील प्रकाश कौंदाडे,डॉ.सुभाष पाटील,निवास कदम, संपत संकपाळ,सतीश पाटील यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. फोटो कॅप्शन शिरोली: यात्रा उरसानिमित्त आयोजित कुस्ती दंगलीतील विजेत्या मल्लांना पुष्पगुच्छ देऊन गौरवताना माजी आमदार महादेवराव महाडिक , कृष्णात करपे, सुरेशराव पाटील, अविनाश कोळी, बाजीराव पाटील,निवास कदम, डॉ. सुभाष पाटील, प्रकाश कौंदाडे राजेश पाटील, पै .राम सारंग आदि.