पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
पुलाची शिरोली येथील प्राथमिक विद्यामंदिर विलास नगर या प्रशालेत सन २०२४ -२५ या घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या एन.एम. एम एस.परीक्षेमध्ये सहा एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक,१६ सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,पालक व मार्गदर्शक शिक्षक यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.माधवी पाटील सचिव अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर प्रमुख पाहुणे सौ.प्रतिभा पाटील तज्ञ संचालिका,ग्रामपंचायत सदस्य महंमद महात उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव उपस्थित होते सन २०२४-२५ यावर्षी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सिद्धी अत्याळकर, रुद्राक्षी कोठावळे,आरती गायकवाड,सिद्धार्थ सातपुते, अन्सा देसाई,समाधान भुसार यांना एन.एम.एम.एस.व सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा फेटा बांधून व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सन २०२३-२४ या सालातील एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीधारक श्रावणी कांबळे,मयूर वाळके, निखिल ठेंगील व २२ सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना फेटा बांधून व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील यशस्वी वर्गशिक्षक व मार्गदर्शक शशिकांत पाटील,श्रीम अर्चना काळे तसेच २०२३-२४ यशस्वी मार्गदर्शक शिक्षक लहू श्रावस्ती , कुंडलिक जाधव,सहाय्यक मार्गदर्शक तुकाराम हराळे,प्रदीप गुरव यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व गुणी शिक्षकांचा फेटा बांधून व मेडल देऊन सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहू श्रावस्ती, कुंडलिक जाधव यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन तज्ञ संचालिका सौ प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.या कार्यक्रमाचे आभार शशिकांत पाटील यांनी मानले या यशा मध्ये शाळेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव पाटील,शाळेचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य मनोज कुमार पाटील ,उपाध्यक्ष महेश कुमार पाटील,तज्ञ संचालिका सौ.प्रतिभा पाटील,मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.यानंतर सर्व यशस्वी विद्यार्थी पालक व शिक्षक या सर्वांनी मिळून सर्व गुणी विद्यार्थ्यांची शिरोली गावातून भव्य मिरवणूक काढली.शिरोली गावचे ग्रामदैवत श्री काशिलिंग बिरदेव व ग्रामपंचायत प्रांगणात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला भव्य मिरवणूक शाळेत परत आली हा सोहळा पाहून उपस्थित पालकानी शाळेचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.