पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
विहिरीत पोहायला गेलेल्या गवंडी काम करणाऱ्या 33 वर्षीय विजय दुुलभा गावडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.ही घटना दुपारी तीन च्या दरम्यान घडली. सायंकाळी सहाच्या दरम्यान मृतदेह शोधून बाहेर काढण्यात इचलकरंजी इथल्या जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आले.
हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील बाळासाहेब हवालदार यांच्या घरामध्ये विजय दुुलभा गावडे हा दोन ते तीन महिन्यापूर्वी पासून भाडेकरू म्हणून राहत आहे.तो मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कामरा या गावचा रहिवासी होता.तो गवंडी काम करत असे.तो अविवाहित असल्याने एकटाच राहत होता.एक महिन्यापूर्वी त्याची बहीण,भाऊजी अभिषेक गावडे आणि त्यांची दोन मुले राहण्यास आली होती.
नेहमीप्रमाणे विजय हा दुपारी दोनच्या दरम्यान कामावरून घरी परत आला होता.घरी आल्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान त्याची भाचे सहा वर्षीय वेदांत आणि दहा वर्षीय आदित्य यांना घेऊन हवलदार यांच्या विहिरीमध्ये अंघोळीसाठी गेला होता.बहिणीने आपल्या पतीलाही विहिरीकडे पाठवले होते.अभिषेक गावडे याला पोहता येत नसल्याने तो विहिरीवर आपला मुलगा आदित्य यास घेऊन बसला होता.गावातील अन्य काही दोन-तीन मुले विहिरीत होत होती.
मयत विजय गावडे याने सहा वर्षीय भाचा वेदांत याला खांद्यावर घेऊन विहिरीत उतरून पोहत दुसऱ्या कडेला जाऊन दगडाला धरून थांबला असता अचानक तो बुडू लागला तिथे पोहणाऱ्या मुलांनी धाव घेऊन आदित्यला विहिरीच्या बाहेर आणले दरम्यान विजय हा विहिरीत बुडला. नातेवाईक आणि मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले काहींनी विहिरीमध्ये उडी मारून शोधा शोध केली पण तो मिळून आला नाही.
अखेर हातकणंगले पोलिसांनी इचलकरंजी इथल्या जीवन मुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाठवले एक तासाच्या अथक परिश्रमान अंतर मयत विजय गावडे चा मृतदेह बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आले.दोनच महिन्यापूर्वी हे कुटुंबिक इथे आल्याने त्यांच्या ओळखीचे असे इथे कोणीच नव्हते तरीही हेरले ग्रामस्थांनी या कुटुंबाला मदत केले या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.