पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे
केंद्र शासन मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एन.एम. एम.एस.मध्ये पुलाची शिरोली येथील प्राथमिक विद्यामंदिर विलास नगर या प्रशालेचे एन एम एम एस शिष्यवृत्तीधारक सहा विद्यार्थी यशस्वी झाले विद्यार्थ्यांना प्रत्येकी 48 हजार रुपये प्रमाणे एकूण दोन लाख 88 हजार रुपये शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहे यामध्ये
सिद्धी शंकर आत्याळकर,रुद्राक्षी शिवकुमार कोठावळे,
आरती बालाजी गायकवाड,सिद्धार्थ अजिनाथ सातपुते,
अन्सा असिफ देसाई,समाधान नामदेव भुसार,या विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त केली
तसेच महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी समृद्धी जयवंत वारके,सिद्धी राजेश पाटील,हर्षिका दिलीप जाधव,सोहन राजेश राऊत,श्रेया रंगराव पाटोळे,निखिल राहुल पाटील,अक्षरा शशिकांत मोकाशी,निलेश दशरथ घोडके,तेजल नितेश अतकरे,संस्कृती दयानंद कालेकर,समर्थ नागनाथ भोसले,आदर्श शंकर ढवळे,केशव शिवाजी पोवार,प्रीती आनंदा मुंडे,यशराज मनोज रगटे,युवराज सोमनाथ चौगुले या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासन राज्यस्तरावर सोळा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८ हजार ४०० याप्रमाणे एकूण सहा लाख १४ हजार ४०० रुपयांचे मानकरी ठरले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक वर्गशिक्षक शशिकांत पाटील,श्रीम अर्चना काळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तसेच यांचे सहकारी मार्गदर्शक शिक्षक कुंडलिक जाधव,लहू श्रावस्ती,तुकाराम हराळे ,प्रदीप गुरव, सौ.वंदना पाटील यांचे सहकार्य लाभले या सर्वांना शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाकरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले या सर्वांना संस्थेचे संस्थापक एस .एन. पाटील वअध्यक्ष डॉ मनोज कुमार पाटील उपाध्यक्ष महेश कुमार पाटील व सचिव सौ. माधवी पाटील तज्ञ संचालिका व मार्गदर्शक शिक्षिका सौ. प्रतिभा पाटील यांचे सहकार्य लाभले सर्व पालक वर्ग हितचिंतक व संस्थेवर प्रेम व विश्वास असणारे ग्रामस्थ यांचेही सहकार्य लाभले .